Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

NEET Exam Paper Leak: नीट परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, NEET सारख्या महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची सुरक्षा आणि गुप्ततेची जबाबदारी थेट भारतीय लष्कराकडे सोपवण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. यासंदर्भात दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) या पेपरफुटी प्रकरणाचा तपास वेगाने करत असून देशभरात मोठ्या कारवाया सुरू आहेत. या प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक केली असून, अटक आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.

सीबीआयने लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे. तसेच पुण्यातील 'APMA' कोचिंग इन्स्टिट्यूटमधील भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांनाही अटक करण्यात आली आहे. तपासात तेजस शाह याने मनिषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचे लीक झालेले प्रश्न मिळवल्याचे उघड झाले आहे.

या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह देशभरातील ४९ ठिकाणी छापेमारी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon