Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पंढरपुरात आषाढी वारीनिम्मित भाविकांची विक्रमी गर्दी; विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 8 कोटी 92 लाखांचे उत्पन्न, १० लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन..

पंढरपूर प्रतिनिधी: आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी ८ कोटी ९२ लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द ०१ (दिनांक १५ जुलै) ते आषाढ शुध्द १५ (दिनांक २९ जुलै) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७१,४०,४०७ रुपये अर्पण, २,९३,९७,०७६ रुपये देणगी, ८३,४७,००० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४६,३१,१०३ रुपये भक्तनिवास, २,४०,३२,४०२ रुपये हुंडीपेटी, १५,२७,४४३ रुपये परिवार देवता तसेच ९६,७२,९३७ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ४५,२०,४३९ इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७५,०५,२९१ रुपये अर्पण, २,८८,३३,५६९ रुपये देणगी, ९४,०४,३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५,४१,४५८ रुपये भक्तनिवास, १,४४,७१,३४८ रुपये हुंडीपेटी, ३२,४५,६८२ रुपये परिवार देवता तसेच ३,५९,६१,७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून १२,४५,०७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले होते.

सन २०२५ च्या आषाढी यात्रेत रु. १०,८४,०८,५३१/- व या वर्षीच्या यात्रेत रु. ८,९२,७२,४७८/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रु. १,९१,३६,०५३/- इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगीतले. आषाढी यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुमारे ४,९५,०२२ भाविकांनी, तर मुखदर्शन सुमारे ५,४२,००० भाविकांनी घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon