Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? मोठे अपडेट समोर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण झाली असली , तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी सकाळी नवीन इंधनदर जाहीर करत सध्याचेच दर कायम ठेवले आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य चर्चांमुळे मध्यपूर्वेतील तणाव काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशात इंधन स्वस्त होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत होती. मात्र, तेल कंपन्यांनी किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही.

मुंबईत सध्या पेट्रोलचा दर 111.21 रुपये, तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर इतकाच कायम आहे . पेट्रोलवरील निर्यात शुल्क वाढवण्यात आले असून, डिझेलवरील शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इंधन क्षेत्रातील आर्थिक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा आगामी काळात देशांतर्गत इंधनदरांमध्ये दिसून येतो का, याकडे सर्वसामान्यांसह वाहतूक क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon