Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

रक्षाबंधनासाठी जळगावच्या बाजारात सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रेझ; दर वाढले तरी बहिणींचा उत्साह कायम

क्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या राख्यांना विशेष मागणी पाहायला मिळत आहे. भाववाढ झालेली असतानाही आपल्या भावासाठी आकर्षक आणि खास राखी घेण्याकडे महिला आणि तरुणींचा कल दिसून येत आहे.

जळगावच्या बाजारात यंदा सुमारे 500 रुपयांपासून तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतच्या सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. साध्या राख्यांपासून डिझायनर आणि आकर्षक पॅटर्नमधील राख्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारात चांगलीच लगबग वाढली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील रक्षाबंधनावेळी सोन्याचा दर सुमारे 1 लाख 12 हजार रुपये, तर चांदीचा दर 1 लाख 16 हजार रुपये होता. यंदा जळगावमध्ये सोन्याचा दर सुमारे 1 लाख 58 हजार 500 रुपये, तर चांदीचा दर 2 लाख 45 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात सुमारे 45 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 1 लाख 29 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

मात्र, दरवाढीचा फारसा परिणाम राखी खरेदीच्या उत्साहावर झालेला दिसत नाही. 'भाव कितीही असले तरी भाऊ आमच्यासाठी अनमोल आहे', अशी भावना अनेक बहिणी व्यक्त करत आहेत. भावासाठी काहीतरी खास देण्याची इच्छा असल्याने सोन्या-चांदीच्या राख्यांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच सोन्याच्या दरात सुमारे 4 हजार रुपये, तर चांदीच्या दरात सुमारे 5 हजार रुपयांची एका दिवसात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या जीएसटी वगळता सोन्याचा दर सुमारे 1 लाख 58 हजार 300 रुपये, तर चांदीचा दर 2 लाख 45 हजार रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

रक्षाबंधनासाठी बाजारात ग्राहकांची वाढती गर्दी आणि सोन्या-चांदीच्या राख्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाची उलाढाल मागील वर्षाच्या तुलनेत चांगली राहण्याची अपेक्षा सुवर्ण व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon