Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

रश्मिका मंदानाच्या चाहत्यांना धक्का! डान्स सीन करताना अभिनेत्री जखमी

हॉलिवूड आणि बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. डान्स सिक्वेन्सचे शूट करत असताना तिच्या हिप टेंडनला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली असून, डॉक्टरांनी तिला किमान सहा आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची दुखापत प्रामुख्याने अतिशय कष्टदायक शारीरिक प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडू किंवा व्यावसायिक कलाकारांमध्ये आढळते. त्यामुळे रश्मिकाला आता नियोजित चित्रीकरण काही काळासाठी थांबवावे लागणार आहे. उपचारांसोबतच पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) प्रक्रियेलाही प्राधान्य देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

रश्मिकला सध्या तिच्या आगामी ‘मैसा’ आणि ‘रणबली’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ‘मैसा’ हा गोंड समाजाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित ॲक्शन-ड्रामा चित्रपट असून त्यामध्ये रश्मिका एका दमदार आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केले असून निर्मिती अनफॉर्म्युला फिल्म्सकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अभिनेता विजय देवराकोंडासोबतच्या ‘रणबली’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. राहुल संकृतियन दिग्दर्शित हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहेत.

रश्मिकाच्या दुखापतीमुळे काही दिवस चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon