Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

रावेर: भोकर नदीच्या पुरात तरुण गेला वाहून; बेपत्ता तरुणाचा शोध युद्धपातळीवर सुरु.

रावेर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच बोरखेडा गावाजवळील भोकर नदीच्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.

बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

रावेर येथे आठवडी बाजार भरला होता. बोरखेडा येथील शिवा केशराम निंगवले (वय 28) हे बाजारासाठी रावेर येथे आले होते. दरम्यान, रावेर तालुका आणि सातपुडा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भोकर नदीला मोठा पूर आला होता. दुपारच्या सुमारास बाजार करून शिवा निंगवले हे पायी घरी परतत असताना बोरखेडा येथील भोकर नदीवरील पुलाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर पोलीस, प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

सध्या शिवा निंगवले यांचा शोध सुरू असून पुराच्या पाण्यामुळे शोधकार्याला अडथळे येत आहेत. प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon