Dailyhunt

साखरपुड्याआधी तरुणीने प्रियकरासोबत ठेवले शरीरसंबंध; शरीरसंबंधा दरम्यान तब्येत बिघडली; कुटुंबाकडून तक्रार देण्यास नकार. काय आहे धक्कादायक प्रकार?

साखरपुड्याच्या आधी एक तरुणी आपल्या जिम ट्रेनर प्रियकराला भेटण्यासाठी गेली, दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. याच दरम्यान तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साखरपुड्यापूर्वी तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. मात्र, यावेळी तरुणीला अतिरक्तस्राव होऊ लागल्याने तिची तब्येत अचानक ढासळली.परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच प्रियकराने तिला स्कूटरवरून तातडीने पाटण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो तेथून निघून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.दरम्यान, तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. ही खाजगी बाब असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. तसेच साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आल्याने लग्न मोडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी मात्र या घटनेची नोंद घेत तपास सुरू ठेवला असून संबंधित तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीच्या आधारे केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सध्या या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon