Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

संजय राऊतांचा सत्ताधारकावर जहरी टीका;; "सीतेचं मंगळसूत्र चोरताय, तुमचा बाप दुर्योधन!"

संजय राऊतांनी सत्ताधारकावर जहरी टीका केली, राम मंदिर देणगी प्रकरणावरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील कथित राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.

    या प्रकरणाच्या निषेधार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दादर येथे ‘राम रक्षा आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. हे आंदोलन राज्यभर राबविण्यात येणार असून, पुढे राज्याच्या सीमाबाहेरही नेले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    “राम मंदिराची लूट सुरू आहे”

    संजय राऊत म्हणाले, “राम मंदिरात देणगीच्या नावाने मोठी लूट सुरू आहे. निवडणुकीत मंगळसूत्राचा मुद्दा मांडणारे आज सीतेलाच अर्पण करण्यात आलेली मंगळसूत्रे सुरक्षित ठेवू शकले नाहीत. राम मंदिरातील दागिन्यांच्या चोरीमुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत, “आभूषणे चोरून राज्य करणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये,” असे म्हणत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

    देणगी चोरी प्रकरणात आतापर्यंत ८ जण अटकेत

    दरम्यान, अयोध्या येथील कथित देणगी चोरी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पोलिसांनी आतापर्यंत आठहून अधिक संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, मंदिराच्या व्यवस्थापनावरही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. तपास यंत्रणा संबंधित आरोपींची कसून चौकशी करत असून, प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि चोरीस गेलेल्या दागिन्यांचा मागोवा घेतला जात आहे.

    आंदोलनाची घोषणा

    या प्रकरणावरून ठाकरे गटाने राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथून सुरू होणारे ‘राम रक्षा आंदोलन’ राज्यातील विविध जिल्ह्यांत राबविले जाणार असून, राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

    Dailyhunt
    Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon