Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

सातपुडा पर्वतातील लाखो पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ निंबादेवी धरण झाले ओव्हरफ्लो; पर्यटकाना मात्र प्रवेश बंद.

यावल तालुक्यातील चुंचाळे येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या पश्चिम भागातील व सातपुड्यातील निसर्गरम्य श्रीक्षेत्र मनुदेवी खालोखाल स्थान असलेले निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले असून, या ठीकाणी येणाऱ्या पर्यटन प्रेमींची संख्या वाढली आहे.

आज दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शनिवारपासून हे निंबादेवीचे धरण ओसंडुन वाहु लागले आहे अनेक दिवसांपासुन जिल्ह्यातील लाखो पर्यटक हे या आकर्षणाचे केन्द्र असलेल्या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रतिक्षेत होते. मागील दोन तीन वर्षांपूर्वीच्या काळात‌ या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.‌ त्यावेळीच यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे मोशी डॅमची अनुभुती पर्यटकांना याठिकाणी गेल्यावर येते असे पर्यटकांचे म्हणणे आहे.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हे धरणावर यावल, फैजपुर, किनगाव, नायगाव, चुंचाळे कोरपावली, जळगाव, भुसावळ शहरासह विविध ठीकाणाहुन शहरी जिवनातील गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी आणी निसर्गाशी जोडण्यासाठी ही एक संधी असल्याचे समजुन मोठमोठी डोंगरातुन नैसर्गीक हिरवगार झाडे व नयनरम्य पर्वतास बघण्यासाठी सहली च्या निमित्ताने बघणाऱ्या पर्यटकांची या ठीकाणी गर्दी होत असते .

यात संपुर्ण जिल्ह्यातील भाविक श्रध्दा असल्याने या ठिकाणी आपली हजेरी लावत असुन यावल तालुक्यातील हे एक निसर्गरम्य ठिकाण म्हणुन या डॅमची गणना केली जात आहे. मागील घटनांच्या पार्श्वभुमीवर या ठीकाणी पर्यटकांची गर्दी होत असते त्यासाठी काही अप्रीय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने निंबादेवीचे पर्यटनस्थळ पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन धरणाच्या ठीकाणी प्रवेश बंदी करण्यात आली असुन ,या ठीकाणी यावलचे पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणी गृहरक्षकदलाचे महीला व पुरुष कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon