नंदुरबार: शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, युवा नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या कार्याने प्रेरित होऊन अजय सोनवणे सह शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
नंदुरबार येथील आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते असलोद ग्रामपंचायत सदस्य तथा वीर एकलव्य स्मारक संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे यांच्यासह हरचंद भिल, दाजभाऊ रूपसिंग, अनिल भिल, रविंद्र ठाकरे, कैलाश पवार, राजेश पवार, रुबास पवार, पुंजू भिल, रामदास वळवी आणि दिवान भिल या प्रमुख कार्यकर्त्यांना शिवसेनेचा गमछा परिधान करून पक्षात प्रवेश देण्यात आला. सर्व नवागत कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करण्यात आले.
हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या विशेष प्रयत्नातून व शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शहादा तालुका व शहरात शिवसेना जोमाने कार्यरत असून पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक सातत्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक लोकहिताच्या योजना सुरू केल्या असून त्यांचा लाभ प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचत असल्यामुळे शिवसेनेबद्दल जनतेत विश्वास व आकर्षण वाढत आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार झपाट्याने होत आहे.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून प्रत्येक कार्यकर्त्याने जनसेवेच्या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे.तसेच शहादा येथील शिवसेना आमदार संपर्क कार्यालयात मी स्वतः दर शुक्रवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपस्थित राहून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असेही श्री.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह कुणाल वसावे, गजेंद्र शिंपी, शिवसेना शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल, शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, वाहतूक सेनेचे मुरली वळवी, हेमंत सूर्यवंशी, गोपाल कोळी, धनराज जायसवाल, पृथ्वीसिंग राजपूत तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
