Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच; ग्राहकही आनंदी, जाणून घ्या आजचे भाव काय?

सोन्या-चांदीच्या दरातील घसरण कायम असून आजही दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घट नोंदवली गेली. सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली, तर चांदीचे दर 4 हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

जळगाव सुवर्णनगरीत सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने पडझड सुरू असून या कालावधीत सोन्याचे दर सुमारे 3 हजार 700 रुपयांनी खाली आले आहेत. दुसरीकडे चांदीतही मोठी घसरण होत तब्बल 12 हजार रुपयांची कमी नोंदवली गेली आहे.

सध्य परिस्थितीत जीएसटीविना सोन्याचे दर 1 लाख 53 हजार रुपयांपर्यंत खाली आले असून चांदीचे दर 2 लाख 62 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष सराफा बाजाराकडे लागले आहे.

एकंदरीत आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही या दरांवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी सोन्या-चांदीतील गुंतवणूक कमी होत असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon