Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

'तुझ्या पार्टनरला लाज वाटेल' ; हृतिक रोशनला कंगना रणौतचे सडेतोड प्रत्युत्तर; जुना वाद पुन्हा चर्चेत.

भिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील अनेक वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 'We Owe Hrithik Roshan an Apology' या ट्रेंडवर हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याला सडेतोड उत्तर दिले.

यावेळी तिने हृतिकची मैत्रीण सबा आझाद हिचाही उल्लेख केला.

कंगनाने आपल्या पोस्ट मध्ये हृतिक आणि सबा यांना त्यांच्या नात्यासाठी शुभेच्छा देत, एका महिलेला लक्ष्य करणाऱ्या किंवा तिची खिल्ली उडवणाऱ्या पोस्टला प्रोत्साहन देणे योग्य नसल्याचे म्हटले. आपल्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्यांचा निषेध करायला हवा होता, असेही तिने नमूद केले.

पुढे तिने हृतिकला “आगीत तेल ओतू नकोस” असा सल्ला देत, “तुझ्या पार्टनरला लाज वाटेल असे वागू नको,” असेही म्हटले. यासोबतच हृतिकच्या प्रतिक्रियेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला.

वाद हा पुन्हा चर्चेत येण्यामागे सोशल मीडियावर सुरू झालेला ‘We Owe Hrithik Roshan an Apology’ हा ट्रेंड कारणीभूत ठरला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान कंगना रणौतने केलेल्या एका वक्तव्यावरून तिच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर तिचे जुने व्हिडिओ आणि पोस्ट पुन्हा व्हायरल झाले. याच काळात हा ट्रेंड सुरू झाला.

दरम्यान एका सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना हृतिक रोशनने कोणत्याही व्यक्तीबद्दल संपूर्ण तथ्य न जाणता भूमिका घेणे ही समाजातील गंभीर समस्या असल्याचे मत व्यक्त केले. योग्य संदर्भ आणि वस्तुस्थितीसमोर आल्यानंतरच चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद 2016 पासून चर्चेत आहे. त्यावेळी कंगनाने हृतिकवर गंभीर आरोप केले होते आणि दोघांमधील प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचले होते. हृतिकने ते सर्व आरोप नाकारले होते. अनेक वर्षांनंतर आता सोशल मीडियावरील नव्या घडामोडींमुळे हा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon