Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

WhatsApp वर अचानक 24 तासांची बंदी? 'Account Under Review' मेसेज दिसताच घाबरू नका; कारण आणि उपाय जाणून घ्या

जगभरात कोट्यवधी लोक वापरत असलेल्या व्हॉट्सॲपवर अनेक वापरकर्त्यांना अचानक 'This account is under review for 24 hours' असा संदेश दिसू लागल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही खात्यांवर तात्पुरते निर्बंध आणण्यात आल्याने सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

व्हॉट्सॲपकडून स्पॅम, फसवणूक, बनावट माहितीचा प्रसार आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेदरम्यान काही वापरकर्त्यांची खाती 24 तासांसाठी पुनरावलोकन (Review) प्रक्रियेत ठेवली जात आहेत.

कंपनीच्या धोरणानुसार, कमी वेळात मोठ्या प्रमाणात संदेश पाठवणे, अनोळखी लोकांकडून वारंवार स्पॅम तक्रारी येणे, अधिकृत ॲपऐवजी GB WhatsApp किंवा WhatsApp Plus सारख्या अनधिकृत आवृत्त्यांचा वापर करणे, तसेच संशयास्पद लिंक्स किंवा दिशाभूल करणारी माहिती वारंवार शेअर करणे अशा कारणांमुळे खाते तपासणीसाठी निवडले जाऊ शकते.

खाते रिव्ह्यूमध्ये गेल्यास काय करावे?

24 तासांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. अनेक प्रकरणांमध्ये खाते आपोआप पुन्हा सुरू होते.

ॲपमध्ये दिसणाऱ्या ‘Request a Review’ पर्यायाद्वारे अपील करा.

Google Play Store किंवा Apple App Store वरून अधिकृत आणि अद्ययावत WhatsApp आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा.

24 तासांनंतरही खाते सुरू झाले नाही, तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि संबंधित माहिती देऊन WhatsApp सपोर्टशी ई-मेलद्वारे संपर्क साधा.

तज्ज्ञांच्या मते, अधिकृत व्हॉट्सॲप वापरणे, अनोळखी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात संदेश न पाठवणे आणि प्लॅटफॉर्मच्या नियमांचे पालन करणे, यामुळे अशा कारवाईपासून बचाव होऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon