ब्राझील ते ऑस्ट्रेलियापर्यंत 15 हजार किमीचा प्रवास
जगातील सर्वात मोठ्या सागरी जीवांमध्ये सामील हंपबॅक व्हेलने एक अनोखा विक्रम केला आहे. दोन हंपबॅक व्हेल्सने ब्राझील आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 14000 ते 15,100 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापून स्वत:च्या प्रजातीचा सर्वात लांब प्रवास पूर्ण केला आहे.
यापूर्वी कुठल्याही हंपबॅक व्हेलने अशाप्रकारचा विक्रम नेंदविला नव्हता. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या टीमने व्हेलच्या शेपटाच्या छायाचित्रांच्या आधारावर या दोघांच्या प्रवासाला ट्रॅक केले आहे. या छायाचित्रांमध्ये काही सामान्य छायाचित्रकारांकडून टिपण्यात आलेली छायाचित्रेही सामील होती.
व्हेलची ओळख कशी पटविली?
प्रत्येक हंपबॅक व्हेलच्या शेपटाखालील पॅटर्न अत्यंत अनोखा असतो. मानवी बोटांच्या ठशांप्रमाणे ही स्थिती असते. वैज्ञानिकांनी 1984 पासून 2005 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत घेण्यात आलेल्या 19000 हून अधिक छायाचित्रांचे विश्लेषण पेले. इमेज रिकग्निशन एल्गोरिदमच्या मदतीने त्यांनी मॅच शोधले आणि दोन्ही व्हेल्सच्या पूर्ण प्रवासाला जोडले आहे.
पहिल्या व्हेलला सर्वप्रथम 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथील हर्वे बे येथे पाहिले गेले होते. नंतर 2013 मये त्याला त्याच ठिकाणी पाहिले गेले. 6 वर्षानी 2019 मध्ये हा ब्राझीलच्या साओ पावलोनजीक दिसून आला. या दोन्ही ठिकाणांदरम्यान थेट अंतर सुमारे 14,200 किलोमीटर आहे.
दुसऱ्या व्हेलने उलटा प्रवास केला. 2003 मध्ये तो ब्राझीलच्या बाहिया किनाऱ्यावर पाहिला गेला. जवळपास 22 वर्षांनी 2025 मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाच्या हर्वे बे येथे पाहिले गेले. याच्या प्रवासाचे अंतर 15,100 किलोमीटर सांगण्यात आले. यापूर्वी हा विक्रम कोलंबिया ते आफ्रिकेपर्यंत 13000 किलोमीटरचा होता.
दक्षिण गोलार्धातील हंपबॅक व्हेल्स सर्वसाधारणपणे निश्चित मार्गावरच हिंडत सतात. ते थंड पाणीयुक्त भागांमध्ये शिकार करतात आणि गरम पाण्याच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये प्रजनन करतात. मादी व्हेल स्वत:च्या पिल्लांना हे मार्ग शिकवितात, याचमुळे ते सर्वसाधारणपणे एकाच मार्गावर वारंवार प्रवास करतात.
इतका लांब प्रवास का?
वैज्ञानिक याचे अचूक कारण अद्याप जाणून घेऊ शकले नाहीत, परंतु काही शक्यता आहेत…
-समुद्रात होत असलेले बदल, खासकरून हवामान बदलामुळे प्रवासाचे मार्ग प्रभावित होत आहेत.
-मूळ क्षेत्रांमध्ये आहाराची कमतरता किंवा दबावामुळे काही व्हेल नव्या ठिकाणांच्या शोधात बाहेर पडले आहेत.
-हे दीर्घ प्रवास आनुवांशिक विविधता (जेनेटिक डायव्हर्सिटी) वाढविण्यास देखील मदत करू शकतात.
-नर हंपबॅक व्हेल आवाज काढण्यास तरबेज असतात, नव्या ठिकाणी पोहोचून ते नव्या प्रकारचा आवाज शिकू शकतात.
हंपबॅक व्हेल कधीकाळी विलुप्त होण्याच्या मार्गावर होते, माणसांकडून अत्याधिक शिकारीमुळे त्यांची संख्या कमी झाली होती. परंतु मागील काही दशकांमधील संरक्षण प्रयत्नांमुळे त्यांच्या संख्येत लक्षणीय वृद्धी झाली आहे.
जॅकब एलोर्डीसोबत रिलेशनशिपमध्ये केंडल
अभिनेता जॅकब एलोर्डी आणि केंडल जेनर पुन्हा एकदा एकत्र पाहिले गेले आहेत. यामुळे त्यांच्या डेटिंगविषयीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. दोघेही लॉस एंजिलिसमध्ये काइली जेनर आणि टिमोथी चालमेटसोबत एकाच कारमध्ये दिसून आले.
जॅकब आणि केंडल यांच्या डेटिंगविषयी दीर्घकाळापासून चर्चा रंगत आहेत. छायाचित्रांमध्ये जॅकब हा कार चालवत होता, तर केंडल पुढील सीटवर त्याच्या शेजारी बसली होती. तर काइली अन् टिमोथी हे अन्य एका मित्रासोबत मागील सीटवर बसले होते.
काही काळापूर्वी दोघेही एकत्र हॉलिडे साजरा करताना दिसून आले हेते. यांना बीचवर वेळ घालवताना आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये डिनरचा आनंद घेताना पाहण्यात आले होते. जॅकब आणि केंडल हे दोघेही परस्परांच्या सोबतीचा आनंद घेत आहेत. जस्टिन बीबरकडून आयोजित एका आफ्टर पार्टीतही दोघांमधील जवळीक दिसून आली होती.
जॅकब यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. ओलिविया जेड जियानुल्ली, काइया गेर्बर, जेंडाया आणि जॉय किंग यांचा यात समावेश आहे. तर केंडिल ही यापूर्वी डेविन बुकर आणि बेन सीमन्ससोबत नात्यात राहिली आहे.

