Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधार कार्डचे डिझाइन बदलणार नाही

आधार कार्डचे डिझाइन बदलणार नाही

सोशल मीडियावरील दावा खोटा असल्याचे सरकारने केले स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आधार कार्डच्या डिझाइनमधील बदलाशी निगडित सोशल मीडियावर करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

आधारकार्डचे स्वरुप बदलले जात असल्याचा दावा काही पोस्ट्सद्वारे करण्यात आला होता. हे दावे सरकारने फेटाळले आहेत. आधारला केवळ छायाचित्र आणि क्यूआर कोडयुक्त छोट्या फॉर्मेटमध्ये बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारने सांगितले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने एक अधिकृत वक्तव्य जारी करत स्थिती स्पष्ट केली. आधारच्या फॉर्मेटमध्ये बदलाची सूचना देणाऱ्या कथित ऑनलाइन बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट पूर्णपणे चुकीच्या आहेत असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

वर्षाच्या अखेरपर्यंत आधारचा लुक बदलण्यात येईल असा दावा अनेक पोस्ट्सद्वारे वारंवार केला जातोय. या दाव्याद्वारे केवळ एक छायाचित्र आणि क्यूआर कोड आधारकार्डवर असेल अशी अफवा पसरविण्यात येत आहे, परंतु अशाप्रकारच्या कुठल्याही योजनेवर विचार केला जात नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

भ्रम पसरविण्याचा प्रयत्न

अशाप्रकारचे खोटे दावे जनतेच्या मनात अनावश्यक भ्रम निर्माण करत आहेत. लोकांनी केवळ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा. याचबरोबर पीआयबीकडून जारी पत्रकांनाच अधिकृत माहितीचा स्रोत मानावा असा सल्ला सरकारने लोकांना दिला आहे.

आधारचे व्यापक महत्त्व

आधार जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली ठरली आहे. शासकीय आकडेवारीनुसार वर्तमानात जवळपास 134 कोटी आधारकार्ड धारक आहेत. युआयडीएआयकडून व्यवस्थापन करण्यात येणारी ही प्रणाली विविध सेवांसाठी ओळख पडताळणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat