Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेता दर्शन जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात

अभिनेता दर्शन जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात

बेंगळूर : चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी कारागृहात असलेल्या कन्नड अभिनेता दर्शन याने जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साक्षीदारांच्या चौकशीला विलंब होत आहे.

त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती दर्शनने केली आहे. दर्शनने यापूर्वी जामिनासाठी दोन वेळा उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्याच्या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने आता सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदर याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध होण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat