Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अल्पवयीनांच्या हाती दुचाकी

अल्पवयीनांच्या हाती दुचाकी

आणखी एका पालकाला 25 हजारांचा दंड

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : अल्पवयीन मुलांकडे दुचाकी देऊ नये, असे आवाहन पोलीस दलाने वारंवार करूनही हे प्रकार काही थांबले नाहीत. पोस्टमन सर्कलजवळ दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला अडवून त्याच्या कुटुंबीयांना 25 हजार रुपये दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणाऱ्या एका पालकांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. शुक्रवारी 29 मे रोजी रात्री 8.42 वाजण्याच्या सुमारास केए 22 एचएच 1441 क्रमांकाची दुचाकी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. हा प्रकार लक्षात येताच दुचाकी अडवून त्या मुलाच्या कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणे कायद्याने गुन्हा आहे.

दुचाकीचे मालक किंवा त्या मुलाच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी अनेकवेळा दिला आहे. त्याचे स्मरण करून देत त्यांना न्यायालयात 25 हजार रुपये दंड भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे दुचाकी देऊ नये, वारंवार सूचना करूनही त्यांना दुचाकी चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांवर किंवा दुचाकी मालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat