Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
AmbabaiTemple | अंबाबाई मंदिराबाबत खोटी पोस्ट व्हायरल; कोल्हापुरात संताप

AmbabaiTemple | अंबाबाई मंदिराबाबत खोटी पोस्ट व्हायरल; कोल्हापुरात संताप

अंबाबाई मंदिरातील कथित घटनेची पोस्ट ठरली बनावट

कोल्हापूर -एक्स या समाज माध्यमाद्वारे राधा रमण दास या व्यक्तीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अन्य धर्मातील लोकांनी मांस घेऊन प्रवेश केला.

अशी खोटी पोस्ट व्हायरल करुन शुक्रवारी भाविकांना धक्काच दिला. मंदिरात काही धार्मिक घोषणा दिल्याबद्दल श्रीपुजकांनी मांस घेऊन आलेल्या लोकांना मारल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये आहे. तसेच दोन महिन्यापूर्वी वाडिरत्नागिरीवरील जोतिबा मंदिरात घडलेल्या मारहाणीचा व्हिडिओ पोस्टसोबत व्हायरल करुन हा व्हिडिओ अंबाबाई मंदिरातीलच असल्याचे दाखवण्याचा खोडसाळपणासुद्धा केला आहे.

संबंधीत पोस्टबाबत श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपुजक मंडळाने सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात लेखीपोस्ट व्हायरल करणाऱ्या राधा रमण दासवर कायरेशीर कारवाईची मागणी
तक्रार दिली आहे. तसेच खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणीही तक्रार अर्जासोबत केली. पोलिसांनीही तक्रारीला गंभीरपणे घेऊन वादग्रस्त पोस्ट व्हायलर करणाऱ्या कडक शिक्षा केली जाईल, असे सांगितले. तसेच वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणारा राधा रमण दासचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जाईल, असेही सांगितले.

दरम्यान, एक्स या समाज माध्यमाद्वारे राधा रमण दास या परगावच्या व्यक्तीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराबाबत व्हायरल केलेली खोटी पोस्ट कोल्हापुरातील लोकांना दुपारहीपहायला मिळाली. त्यातील अनेकांनी श्रीपुजक मंडळाचे माधव मुनीश्वर आणि माजी नगरसेवक व श्रीपुजक अजित ठाणेकर यांना बादग्रस्ट पोस्टबद्दलची माहिती सांगितली. मुनीश्वर व ठाणेकर यांनी पोस्टबद्दल माहिती जाणून घेतली. यानंतर काही श्रीपुजकांनी थेट जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन अंबाबाई मंदिराबद्दलची राधा रमण दास याने व्हायरल केलेल्या खोट्या पोस्टची माहिती दिली. तसेच दास विरोधात लेखी तक्रारही केली.

एक्स माध्यमाद्वारे राधा रमण दास याने आपल्या अकाउंटवरून एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच ही वादग्रस्ट पोस्ट डिलिट करण्याबाबत संबंधित योग्य ती पावले उचलली जावीत, असेही तक्रार अर्जात नमुद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat