Dailyhunt
अॅम्पीअर मॅग्नस निओ ईव्ही स्कूटर लाँच

अॅम्पीअर मॅग्नस निओ ईव्ही स्कूटर लाँच

सुरुवातीची पिंमत 86,999 रुपये : 118 किमीचे देणार मायलेज

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतात आपली अद्ययावत इलेक्ट्रिक स्कूटर अॅम्पीअर मॅग्नस निओ लॉन्च केली आहे.

नवीन मॉडेलमध्ये मोठे बदल करण्याऐवजी, कंपनीने दैनंदिन वापर सुधारण्यासाठी तिची रचना केली आहे. दरम्यान कंपनीचा दावा आहे की, ही ई-स्कूटर पूर्ण चार्जवर 118 किमीची रेंज देईल आणि तिचा टॉप स्पीड 65 किमी प्रति तास आहे. दिल्लीमध्ये तिची एक्स-शोरूम किंमत 86,999 ठेवण्यात आली आहे. भारतात, ही स्कूटर बजाज चेतक आणि अॅथर रिझट यांच्याशी स्पर्धा करणार आहे.

डिझाइन : लांबच्या प्रवासासाठी आरामदायक सीट चालकाचा थकवा कमी करण्यासाठी कंपनीने मॅग्नस निओत काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत.

सीट आणि चाके : लांबच्या आरामदायक प्रवासासाठी सीटची पुनर्रचना करण्यात आली आहे. याची सीटची उंची आता 777 मिमी आहे, जी कमी उंचीच्या लोकांसाठीही आरामदायक आहे. यात मागील चाके 10-इंचाची आहेत.

वजन : स्कूटरचे वजन 103 किलो आहे. हलक्या वजनामुळे, रहदारीत ती हाताळायला आणि पार्क करायला खूप सोपी आहे.

कार्यक्षमता : एका चार्जवर 118 किमीची रेंज अॅम्पियर मॅग्नस देते. यात कार्यक्षमतेसाठी 2.3 केडब्लूएच एलएफपी(लिथियम फेरस फॉस्फेट) बॅटरी आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर इंडियन ड्रायव्हिंग सायकल (आयडीसी) अंतर्गत 118 किमीची रेंज देते.

स्मार्ट फीचर्स : या स्कूटरमध्ये 3.5-इंचाचा एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, संपूर्ण एलईडी लायटिंग सेटअप आणि मोबाईल चार्जिंगसाठी एक यूएसबी पोर्ट आहे.

स्टोरेज : यात सीटखाली 22 लिटरची स्टोरेज स्पेस मिळते, जिथे हेल्मेट किंवा छोटी बॅग सहज ठेवता येते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat