वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानमध्ये सोमवारी भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे 3:07 वाजता हा भूकंप झाला.
लोक झोपेत असतानाच काही भागात याचे झटके स्पष्टपणे जाणवले. याचा केंद्रबिंदू 179 किमी खोलीवर होता. या आपत्तीमध्ये तूर्तास कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दोन दिवसांपूर्वीच भारतातील जम्मू काश्मीरमध्ये 12 तासात चारवेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते.

