Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अरे बापरे! दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला, शस्त्रे आणि स्फोटकं जप्त.ISI शी संंबंधित ९ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

अरे बापरे! दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला, शस्त्रे आणि स्फोटकं जप्त.ISI शी संंबंधित ९ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

देशाच्या राजधानीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीत रचलेला एक मोठा दहशतवादी कट दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला आहे, मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत ९ दहशतवाद्यांना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगताशी संबंधित एका संशयित दहशतवादी गटाचा पर्दाफाश केला आहे.

अमर उजालाच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या संशयितांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई दीर्घकाळ चाललेल्या तपासावर आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. या गटाच्या हालचालींवर काही काळापासून पाळत ठेवण्यात आली होती, ज्यामुळे एका समन्वित कारवाईत त्यांच्या सदस्यांना अटक करण्यात आली.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आणि घातपाताचा कट

प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, अटक केलेले आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि मुंबईतील गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींच्या सांगण्यावरून काम करत होते.

त्यांना राजधानीतील महत्त्वाच्या आस्थापना आणि सुरक्षा दलांच्या तळांना लक्ष्य करण्याचे काम सोपवण्यात आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सार्वजनिक ठिकाणी आणि सुरक्षा आस्थापनांवर हल्ल्यांचा कट रचत होते.

कनेक्शन शोधण्याची मोहिम

सध्या, अटक केलेल्या आरोपीचे संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्याचे, इतर साथीदारांना ओळखण्याचे आणि जप्त केलेल्या शस्त्रे व स्फोटकांच्या स्रोताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली पोलीस या प्रकरणात सीमापार संबंध, निधीपुरवठा नेटवर्क आणि परदेशात असलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचाही तपास करत आहे.

अणुउर्जा प्रकल्प, विमानतळावर हल्ला करण्याचा कट

या कारवाईनंतर केलेल्या पोलिस तपासात असे उघड झाले आहे की, संशयित वीज प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याचा कट रचत होते. पाकिस्तानमधून पाठवलेली स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा गुन्हेगारी जगताच्या मदतीने देशात दहशत निर्माण करण्याचा एक धोकादायक कट रचत होती .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat