Dailyhunt
अर्जुन, आदित्य सिंग विजेते

अर्जुन, आदित्य सिंग विजेते

वृत्तसंस्था, मुंबई

हाराष्ट्र पिकलबॉल खुल्या स्पर्धेत प्रो पुरूषांच्या दुहेरी प्रकारात अर्जुन सिंग आणि आदित्य सिंग यांनी विजेतेपद पटकाविले तर महिलांच्या दुहेरीत मिहीका यादव आणि स्नेहल पाटील विजेत्या ठरल्या.

या स्पर्धेमध्ये किमान 1 हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

पुरूष दुहेरीच्या अंतिम लढतीत अर्जुन आणि आदित्य या जोडीने स्तव्या भसीन आणि अमोल यांचा तीन सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. तसेच अर्जुन आणि नाओमी अमलसाडीवाला यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविताना पर्ल अमलसाडीवाला आणि स्तव्या यांचा पराभव केला. या स्पर्धेत अथर्व खिस्तीने पुरूष एकेरीचे तर आहाना पंजाबीने महिला एकेरीचे जेतेपद मिळविले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat