Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ashadhi Wari 2026 पालखी मार्गावरही अन्नपदार्थांची तपासणी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती; हॉटेलमध्येही पाहणी

Ashadhi Wari 2026 पालखी मार्गावरही अन्नपदार्थांची तपासणी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती; हॉटेलमध्येही पाहणी

त. भा. प्रतिनिधी पिंपरी

षाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गांवर हॉटेल, अन्नपदार्थ, प्रसाद व अन्नदान संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

यासाठी दोन्ही मार्गावर मिळून 20 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
भेसळयुक्त पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मोहीम सुरू असून, पालखी मार्गावरही खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येईल.

आरोग्याच्या उपाययोजना

आळंदी व देहू येथून या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने भाविक, वारकरी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. मार्गावर दिंडीधारक, भाविकांना अथवा संस्थांकडून वारकरी, विविध ठिकाणी हॉटेल, खानावळी येथे वेगवेगळ्या पद्धतीने अन्नदान केले जाते. तसेच प्रसाद दिला जातो. त्याबाबतची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच रस्त्यावर विव्रेते, हातगाडीचालक हे विविध खाद्यपदार्थ विक्रीला ठेवतात.

यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका होऊ नये, यासाठी त्याचीही तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावर बाटलीबंद पाण्याच्या लेबलची पाहणी, तळलेल्या पदार्थाची 'टीपीसी' मीटरद्वारे पडताळणी, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्री थांबवणे, खराब व खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ नष्ट करण्यासह मिठाई, प्रसाद विव्रेते तसेच अन्य विक्रेत्यांच्या खाद्य वस्तूंवरील 'यूज बाय डेट'ची पाहणी केली जाणार आहे.

माउलींच्या पालखीमार्गावर तपासणी ठिकाणे:
आळंदी परिसर, भवानी पेठ, हडपसर, सासवड (तीन वेगवेगळ्या ठिकाणी), वाल्हे. तुकोबांच्या पालखीमार्गावर तपासणी ठिकाणे – इनामदार वाडा (देहू), विठ्ठल मंदिर (आकुर्डी), निवडुंगा विठ्ठल मंदिर (नाना पेठ, पुणे), नवीन पालखी तळ (कदमकावस्ती, लोणी काळभोर), भैरवनाथ मंदिर (यवत पालखी तळ), श्री विठ्ठल मंदिर (वरंवड), उडवंडी (बारामती), शारदा विद्यालय (बारामती), सणसर (बारामती), निमगांव केतकी (इंदापूर), पालखी तळ (इंदापूर), सराटी (इंदापूर).

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat