Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अस्थिपंजरांचे सरोवर

अस्थिपंजरांचे सरोवर

त्तराखंड राज्यातील नैनीताल नगर हे 'सरोवरांचे नगर' म्हणून प्रसिद्ध आहे. याच राज्यात 'अस्थिपंजरांचे सरोवर' नामक एक स्थान असून ते अतिशय प्रसिद्ध आहे. या सरोवरात मासे किंवा अन्य जीव फारशा संख्येने नसून मानवी कवट्या आणि अस्थिपंजर असल्याचे दिसून येते.

हे सरोवर 'रुपकुंड' नावाने परिचित आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 16 हजार 500 फूट इतकी आहे. हे सरोवर वर्षाचा बहुतेक कालावधी हिमाच्छादित असते. मात्र, मे आणि जून मध्ये तापमान वाढते, तेव्हा या सरोवरातील हिम वितळते आणि नितळ पाण्यामधून या सरोवराचा तळ दिसू लागतो. याच काळात या सरोवरात अनेक मानवी कवट्या आणि मानवी अस्थिपंजर पाण्यात हालचाल करताना दिसू लागतात. हे अद्भूत दृष्य पाहण्यासाठी या काळात या सरोवराच्या परिसरात अनेक पर्यटक येतात. सरोवरातील दृष्य पाहून अनेक पर्यटकांनी भीतीने गाळण उडते. अनेक आख्यायिका यासंदर्भात प्रसिद्ध आहेत. या मानवी अस्थिपंजरसदृश वस्तूंचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न झालेला आहे.

हे अस्थिपंजर जपानी सैनिकांचे असावेत, असे अनुमान प्रारंभी व्यक्त करण्यात आले होते. कारण जपानने अनेक दशकांपूर्वी चीनवर हल्ला केलेला होता. त्यावेळी अनेक जपानी सैनिक या सरोवरापर्यंत आलेले होते, अशी ऐतिहासिक नोंद आहे. भारतात ब्रिटीशांचे शासन होते, तेव्हा ब्रिटीशांनी तज्ञ पाठवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण हे अस्थिपंजर बरेच जुने असल्याने ते जपानी सैनिकांचे नाहीत, ही बाब सिद्ध झाली. या अस्थिपंजरांसंदर्भात एक कथा अशी की, येथे नंदादेवीचे मंदिर आहे. पुरातन काळी एक राजा या देवीच्या दर्शनाला आला. तो येताना आपले सहकारी घेऊन आला. देवीची इच्छा त्याने एकट्याने यावे, अशी होती. देवी रागावली आणि तिच्या शापाने राजासह सर्वजणांचे प्राण गेले. त्यांचेच हे अस्थिपंजर आहेत. अशा आणखीही आख्यायिका या सरोवरासंबंधी प्रचलित आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat