बॉबी देओल स्वत:च्या कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात वेगळ्या भूमिका साकारण्यावर भर देत आहे. अनुराग कश्यपकडून दिग्दर्शित 'बंदर' चित्रपटात बॉबी पुन्हा एकदा इंटेन्स भूमिकेत दिसून येणार आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याच्या भूमिकेत अनेक शेड्स दिसून येत आहेत. चित्रपट 'बंदर'च्या ट्रेलरची सुरुवात बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेसोबत होते, जी कमी वयाच्या मुलींना डेट करत असतो. परंतु एका मुलीसोबत झालेली भेट त्याचे आयुष्य बदलून देते. त्याला गजाआड करते.
बॉबी देओल साकारत असलेली व्यक्तिरेखा स्वत:ला निर्दोष ठरवू पाहते, परंतु त्याचे ऐकणारा कुणीच नसतो. बॉबीची भूमिका तुरुंगातील वाईट अनुभवांना तोंड देते. वेगवेगळ्या स्थितीतील त्याचा अभिनय प्रभाव पाडणारा आहे. बंदर या चित्रपटाची कहाणी सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिली आहे.
निखिल द्विवेदी याचे निर्माते आहेत. या चित्रपटात बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा, सपना पब्बी, सबा आझाद, इंद्रजीत सुकुमारन, जितेंद्र जोशी, राज बी. शेट्टी आणि नागेश भोसले हे कलाकार दिसून येणार आहेत. बंदर हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

