Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांकीपूर मतदारसंघात प्रचार शिगेला

बांकीपूर मतदारसंघात प्रचार शिगेला

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन नबीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचा त्याग केला होता आणि ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

त्यामुळे ही जागा रिक्त झाली असून तेथे पोटनिवडणूक होत आहे. येथे भारतीय जनता पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यात प्रमुख संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा नितीन नबीन यांचा पारंपरिक मतदारसंघ असून यावेळी प्रशांत किशोर यांनी येथून उमेदवारी अर्ज सादर केल्याने एक नवी सनसनाटी निर्माण झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी प्रशांत किशोर यांना पाठिंबा व्यक्त केला.

तसेच त्यांनी राष्ट्रीय जनता दलालाही आपला उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीतून येथून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होता कामा नये. कारण मतदार या पक्षाचा पराभव करु इच्छितात, असे तेजप्रताप यादव यांचे म्हणणे आहे. तथापि, तेजप्रताप यादव यांच्या स्वत:चा प्रभाव फारसा मोठा नाही. ते स्वत: मागच्या विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते, असे काही स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे. निवडणूक चुरशीची होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat