Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

अॅबी विल्सनच्या दोन गोलमुळे ऑस्ट्रेलियाची सरशी

वृत्तसंस्था/ पर्थ

येथे झालेल्या मैत्रीपूर्ण मालिकेतील सलामीच्या सामन्यात, नवनीत कौरने पहिल्याच सत्रात गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली असूनही, ही सुरुवातीची आघाडी गमावल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला.

पर्थ येथे झालेल्या चार सामन्यांच्या मैत्रीपूर्ण हॉकी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात, भारतीय महिला हॉकी संघाने आपली सुरुवातीची आघाडी गमावली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-2 अशा फरकाने पराभव पत्करला.

सुरुवातीला आघाडी मिळवून दिली. भारताच्या बचावफळीने अत्यंत खंबीरपणे खेळ करत, मध्यंतरापर्यंत आपली आघाडी कायम राखली. तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात गोल करत अॅबी विल्सनने ऑस्ट्रेलियाला सामन्यात जोरदार पुनरागमन करून दिले. सामन्याच्या पहिल्याच सत्रात नवनीत कौरने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्राचा बहुतांश काळ भारतीय बचावफळी अत्यंत भक्कम राहिली आणि दुसऱ्या सत्रातही त्यांनी आपली आघाडी यशस्वीपणे कायम राखली. मात्र, तिसऱ्या सत्रात सामन्याची गती आणि चित्र पूर्णपणे बदलले. ऑस्ट्रेलियाच्या अॅबी विल्सनने पेनल्टी कॉर्नरच्या दोन संधींचे सोने केले. तिने तिसऱ्या आणि चौथ्या अशा दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी एक गोल करत, यजमान ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय मिळवून दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat