Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय महिला कर्णबधिर क्रिकेट संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा

भारतीय महिला कर्णबधिर क्रिकेट संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय महिला कर्णबधिर क्रिकेट संघ 7 ते 13 जुलै या कालावधीत श्रीलंकेत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 द्रौयावर जाणार आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, 15 शनिवारी जारी करण्यात आलेल्या सदस्यांच्या या संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक काजल धवन करेल, तर निदा झाबी शेख उपकर्णधार असेल. हे सामने मोरातुवा येथील 'डी सोयसा पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम'वर खेळवले जातील. 'इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन'ने (भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटना) पुढील वर्षी मार्चमध्ये भारतात होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेची (ज्यात श्रीलंका आणि त्रिनिदाद व टोबॅगो हे संघही सहभागी असतील) आणि फेब्रुवारी 2028 मध्ये दिल्लीत होणाऱ्या 'डीआयसीसी' महिला टी-20 विश्वचषकाचीही घोषणा केली.

या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी म्हणाल्या, आपल्या कर्णबधिर मुलींना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे, हा भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे; क्रिकेट सर्वांचे आहे. केवळ इथपर्यंत पोहोचूनच तुम्ही अडथळे पार केले आहेत आणि आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. मुंबईत झालेल्या टी-10 कर्णबधिर क्रिकेट स्पर्धेत मुख्य अतिथी म्हणून मी तुमचा खेळ प्रत्यक्ष पाहिला आहे. या महिला खेळाडूंची गुणवत्ता आणि खिलाडूवृत्ती यांनी मला प्रभावित केले. आता मैदानात उतरून भारतीय महिला क्रिकेटपटू काय करू शकतात, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे.

भारतीय महिला कर्णबधिर क्रिकेट संघाची कर्णधार काजल म्हणाली, 'आमच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 दौऱ्यासाठी श्रीलंकेला जाणे म्हणजे केवळ क्रिकेट खेळणे नव्हे, तर हे सिद्ध करणे आहे की, ऐकू न येणे हा पॅशन, कौशल्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या मार्गातील अडथळा ठरू शकत नाही. या संघातील प्रत्येक खेळाडूने अथक परिश्रम घेतले आहेत आणि 'निळी जर्सी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतातील प्रत्येक मुलीच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व आम्ही करणार आहोत.'

भारतीय संघ- काजल धवन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), निदा झाबी शेख (उपकर्णधार), प्रतिमा मिश्रा (यष्टिरक्षक), आकांक्षा कनासिया, रे•ाr ज्योत्स्ना, दीप्ती राणी साहू, श्रद्धा वैष्णव, संगीता, सुकन्या के. एस., रुबी यादव, चांदनी खान, प्रियांशी दीक्षित, डी. कंथम्मा, प्रियांका सैनी आणि अंजली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat