Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारत-उझबेकिस्तान संबंधांना नवी दिशा; युरेनियम, संरक्षण आणि डिजिटल क्षेत्रात सहकार्य;2030 पर्यंत व्यापार 5५ अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

भारत-उझबेकिस्तान संबंधांना नवी दिशा; युरेनियम, संरक्षण आणि डिजिटल क्षेत्रात सहकार्य;2030 पर्यंत व्यापार 5५ अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्यात रविवारी ताश्कंद येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि उझबेकिस्तानमधील द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देण्यात आली.

नागरी अणुऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि खाणकाम यांसह विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

बैठकीत नागरी अणुऊर्जेसाठी दीर्घकालीन युरेनियम पुरवठा सुनिश्चित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सहकार्याचा निर्णय घेण्यात आला. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.

याशिवाय डिजिटल तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. खाणकाम क्षेत्रातही परस्पर सहकार्य आणि भागीदारीच्या नव्या संधी निर्माण करण्यावर चर्चा झाली.

भारत आणि उझबेकिस्तानमधील आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 5 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मोदी आणि मिर्झियोयेव्ह यांच्या बैठकीत द्विपक्षीय संबंधांसोबतच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा झाली. या बैठकीमुळे भारत-उझबेकिस्तान संबंधांना ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि व्यापाराच्या आघाडीवर नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat