Dailyhunt
'चिप'च्या तेजीने सेन्सेक्स ६०० अंकांनी मजबूत

'चिप'च्या तेजीने सेन्सेक्स ६०० अंकांनी मजबूत

शियातील बाजारांमधून सकारात्मक संकेत : इराण-अमेरिकेतील तणावाच्या दरम्यानही दिलासा

वृत्तसंस्था/मुंबई

चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा मोहोल राहिला होता.

दरम्यान आशियाई बाजारांकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने आणि इराण-अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारतीय शेअर बाजार मजबूत होत बंद झाले. तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर ब्लू-चिप शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. आयटी स्टॉक्स आणि निर्देशांकातील अव्वल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील खरेदीनेही बाजारात तेजी आणली. तथापि, व्यवहाराच्या शेवटच्या तासांमध्ये काही प्रमाणात नफावसुलीही दिसून आली. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 77,245 अंकांवर खुला झाला. अखेरच्याक्षणी सेन्सेक्स 609.45 अंकांच्या वाढीसह 77,496.36 अंकांवर बंद झाला.

याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 181.95 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 24,177.65 वर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये आयटीसी सर्वाधिक तेजीत राहिला आहे. यात 3.79 टक्क्यांनी वाढ झाली. टेक महिंद्रा, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, अदानी पोर्ट्स हे प्रमुख वाढलेले शेअर्स होते. दुसरीकडे, इंडिगो, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि ट्रेंट लिमिटेड यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. व्यापक बाजारपेठा मिश्र ट्रेंडसह बंद झाल्या. निफ्टी मिडकॅप 0.07 टक्क्यांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी स्मॉलकॅप 0.65 टक्क्यांनी वाढून बंद झाला. क्षेत्रीय आधारावर, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी रियल्टीने चांगली कामगिरी केली, तर निफ्टी कन्स्ट्रक्शन ड्युरेबल्स आणि निफ्टी मीडियाने खराब कामगिरी केली.

जागतिक बाजारात

आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र कल दिसून येत होता. संयुक्त अरब अमिरात पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार असल्याच्या बातमीचा अर्थ लावण्याचा व्यापारी प्रयत्न करत होते. एस अँड पी एएसएक्स आणि कोस्पी अनुक्रमे 0.23 टक्के आणि 0.24 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत होते.

कच्चे तेल 111 डॉलर प्रति बॅरल

इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर ब्रेंट क्रूड तेल 0.36 टक्क्यांनी वाढून 111.6 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. अमेरिका-इराण चर्चा थांबली आहे आणि त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यास विलंब होत आहे. ही सामुद्रधुनी जागतिक तेल पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे, जिथे व्यत्यय आल्यास बाजारावर परिणाम होतो. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने 1 मे पासून पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

  • आयटीसी 316
  • टेक महिंद्रा 1454
  • रिलायन्स 1430
  • कोल इंडिया 480
  • मारुती सुझुकी 13265
  • भारती एअरटेल 1885
  • टाटा कंझ्युमर 1171
  • महिंद्रा आणि महिंद्रा 3149
  • आयशर मोटर 7185
  • सनफार्मा 1773
  • नेस्ले इंडिया 1461
  • इन्फोसीस 1167
  • हिंदुस्थान युनिलव्हर 2317
  • लार्सन टुब्रो 4083
  • कोटक बँक 382
  • अदानी पोर्ट 1655
  • बजाज फायनान्स 932
  • एचडीएफसी लाईफ 595
  • टीसीएस 2465
  • ग्रासीम 2800
  • देवयानी इंटरनॅशनल 127
  • बंधन बँक 198
  • आरबीएल बँक 381
  • कॅनरा एचएसबीसी 146

  • इंडिगो 4340
  • डॉ. रे•ाrज लॅब्ज 1327
  • एनटीपीसी 400
  • बजाज फिनसर्व्ह 1760
  • आयसीआयसीआय 1279
  • ट्रेंट 4225
  • एचडीएफसी बँक 778
  • एशियन पेंट्स 2451
  • अपोलो हॉस्पिटल 7718
  • हिंडाल्को 1069
  • विप्रो 200
  • जेएसडब्ल्यू स्टील 1278
  • एसबीआय 1088
  • मॅक्स हेल्थकेअर 1004
  • जिओ फायनान्स 250
  • जिंदाल सॉ 229
  • इंडिया सिमेंट्स 401
  • पाईन लॅब्स 197
  • मिशो 172
  • जिंदाल स्टिल 1228
  • टोरेंट पावर 1701
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat