Dailyhunt
डॉ. किरण ठाकुर यांचा आज सांगलीत नागरी सत्कार

डॉ. किरण ठाकुर यांचा आज सांगलीत नागरी सत्कार

डॉ. किरण ठाकुर यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सांगलीकरांच्यावतीने मंगळवारी 7 एप्रिलला कार्यक्रमस्थळी भव्य नागरी सत्कार होणार आहे. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी सभापती अतुल माने, सभागृहनेते संदीप आवटी, मनपा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते युवराज गायकवाड, युवराज बावडेकर, मैनुद्दीन बागवान, तसेच शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, निशिकांत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जनसुराज्य पक्षाचे समित कदम, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता हा गौरव सोहळा होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat