अरभावी-घटप्रभा रोडवर अपघात, महिला गंभीर
भा. प्रतिनिधी/
बेळगाव
दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन दोघा जणांचा मृत्यू झाला. अरभावी-घटप्रभा रोडवर अरभावीजवळ शुक्रवारी ही घटना घडली असून या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
घटप्रभा पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.
दुरदुंडेश्वर अप्पय्या यत्तीनमठ (वय 48) राहणार शिंगलापूर, प्रभा शुगर्स फॅक्टरी, गोकाक, गंगाधर बसाप्पा गौडी (वय 21) राहणार अरभावी, ता. मुडलगी अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवार दि. 22 मे रोजी पहाटे ही घटना घडली आहे. या अपघातात मंजुळा दुरदुंडेश्वर यत्तीनमठ (वय 41) ही महिला जखमी झाली आहे.
दुरदुंडेश्वर व मंजुळा हे दाम्पत्य मोटारसायकलवरून शिंगलापूरहून अरभावीकडे जात होते. अरभावीहून मोटारसायकलवर भाजी घेऊन गंगाधर येत होता. गाणगेर मळ्याजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन दोघा जणांचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाली. घटप्रभा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

