Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dona Paula Goa पोर्तुगीज व्हॉईसरॉयच्या मुलीवरुन नाव ते दु:खद प्रेमकथेची आख्यायिका.. गोव्याच्या दोना पावला बीचच्या यो गोष्टी तुम्हाला माहितेयत का?

Dona Paula Goa पोर्तुगीज व्हॉईसरॉयच्या मुलीवरुन नाव ते दु:खद प्रेमकथेची आख्यायिका.. गोव्याच्या दोना पावला बीचच्या यो गोष्टी तुम्हाला माहितेयत का?

र्यटकांसाठी समुद्रकिनारा वसलेलं गोवा सर्वांसाठीच नेहमी आकर्षण असतं. कित्येकांच्या टूरीझम बकेट लिस्टमध्ये गोव्याचा समावेश असतो. मीरामार बीच, ओल्ड गोवा, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असणारे चर्च असे कितीतरी पॉईंटस देश विदेशातील पर्यटकांना खुणावत असतात.

यापैकी नेहमी चर्चेत असणारं आणि नयनरम्य समुद्राच्या किनारी वसलेलं दोना पावला बीच हेसुद्धा अनेक फिल्ममेकर्स सह पर्यटकांच्या आवडीच्या ठिकांणापेैकी एक आहे.

दोना पावला हे गोवा राज्यातील लोकप्रिय पर्यटन केंद्र खडकाळ माथ्याला दक्षिणेला स्थित असून मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचं शूटींग झाल्याने मोठ्या पडद्यावरही अनेकांनी दोना पावलाचं सौंदर्य न्याहाळलं आहे.

दोना पावला नावामागची कथा

दोना पावलाचं वैशिष्ट्य म्हणजे ते उंच ठिकाणी असल्याने त्या बाजूच्या अरबी समुद्राच्या नितांत सुंदर लाटांच्या क्रीडा मनसोक्त पाहता येतात. या ठिकाणाचं नाव पोर्तुगीज व्हॉईसरॉयच्या मुलीच्या नावावरुन दोना अमराल अँटोनियो डी सौटो मायोर असे ठेवण्यात आले आहे. दोना पावलाची कथा ही दु:खद प्रेमकथेशी संबंधित असल्याची ही चर्चा असते. म्हणूनच या ठिकाणी अनेकदा कपल्सची मोठ्या प्रमाणात ये जा असते.

अब्बे फारियाचा पुतळा

दोना पावला बीचवर तुम्हाला अब्बे फारियाचा पुतळा दिसतो. अब्बे फारिया हा गोव्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते, ते संमोहन क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते, तसेच ते नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनोग्राफीचे संस्थापक म्हणूनही ओळखले जातात.

दोना पावला जेट्टी येथे बोट राइडची सुविधा उपलब्ध आहे. दोना पावला सनसेट व्ह्यू पाँईंट म्हणून ओळखले जाते. पणजी येथील मीरामार बीचपासून साधारण १० किलोमीटर अंतरावर हा बीच आहे.

लोककथा काय सांगते?

गोव्यातील डोना पौला बीच ही एक दंतकथांनी भरलेली कहाणी आहे. सर्वात प्रसिद्ध कथा डोना पौला डी मेनेझेस यांची आहे, ज्या एका पोर्तुगीज व्हाइसरॉयची मुलगी होत्या. स्थानिक लोककथेनुसार, त्या एका मच्छीमाराच्या प्रेमात पडल्या आणि तिला त्याच्याशी लग्न करण्याची परवानगी मिळाली नाही. निराश होऊन तिने समुद्रात उडी मारून आपले जीवन संपवले. तिच्या सन्मानार्थ समुद्रकिनाऱ्याला आणि गावाला त्यांचे नाव देण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat