Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एअर इंडियाची संचालक मंडळाची बैठक 7 मे रोजी

एअर इंडियाची संचालक मंडळाची बैठक 7 मे रोजी

नवी दिल्ली:

वाई उद्योगातील दिग्गज कंपनी एअर इंडियाच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक 7 मे रोजी होणार आहे. त्यात नव्या सीईओंच्या निवडीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाटा समूहाअंतर्गतची एअर इंडिया सध्या तोट्यासह प्रवास करत आहे.

22 हजार कोटीच्या तोट्यासह कंपनीची अवघड वाटचाल सुरु असून नव्या सीईओचाही शोध घेतला जात आहे. येत्या 7 मे रोजी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत कंपनीचा झालेला तोटा व नव्या सीईओबाबत चर्चा केली जाणार आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.

तणावाचा परिणाम

मार्च 2026 संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडिया समूह जवळपास 22 हजार कोटींसह नुकसानीत आहे. अशावेळी संचालक मंडळाला आव्हानांचा सामना पार करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तेलाच्या वाढत्या किमती व पश्चिम आशियातला तणाव याने एअर इंडिया आता खर्चात बचत करण्याच्या उपायांवर विचार करत आहे.

विमान फेऱ्या घटवण्याची योजना

पश्चिम आशियातील तणावामुळे अनेक देशांची विमान सेवा लांबच्या मार्गाने सध्याला होत आहे. याने इंधनावरचा खर्चाचा बोजा वाढतो आहे. विदेशातील सेवेवर दबाव पडतो आहे, असे माजी सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनाम्यापूर्वीच म्हटले होते. जून व जुलैमध्येही विमान फेऱ्यांची संख्या घटवण्याची वेळ येणार असल्याचे समजते. दररोज 100 उ•ाणे कमी करण्याच्या प्रस्तावाचाही विचार होत असल्याचे समजते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat