Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'एम्पायर स्टेट'वर चढून जोडप्याकडून प्रपोज न्यूयॉर्कमधील घटनेनंतर दोघांनाही अटक

'एम्पायर स्टेट'वर चढून जोडप्याकडून प्रपोज न्यूयॉर्कमधील घटनेनंतर दोघांनाही अटक

► वृत्तसंस्था न्यूयॉर्क

मेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका जोडप्याने सुरक्षा व्यवस्था चुकवून प्रसिद्ध 'एम्पायर स्टेट' बिल्डिंगच्या शिखरावर चढून प्रपोज (लग्नाची मागणी) केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला.

या जोडप्याने 'जेव्हा प्रेमाची शक्ती दुसऱ्या प्रेमाच्या शक्तीवर मात करते, तेव्हा जगात शांतता नांदते' असे लिहिलेला बॅनरही टॉवरवर फडकवला. काळ्या रंगाच्या या बॅनरवर पांढऱ्या रंगात प्रेमाचा संदेश लिहिण्यात आला होता. बॅनर फडकवल्यानंतर दोघांनीही एकमेकांना लग्नाची मागणी घातली. या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी जिन्याच्या साहाय्याने त्या जोडप्यापर्यंत पोहोचून त्यांना सुखरूप खाली आणले. अँजेला निकोलाऊ आणि इव्हान कुझनेत्सोव्ह अशी संबंधित जोडप्याचे नाव आहे. त्यांच्यावर सुरक्षा भेदणे, बेकायदेशीर प्रवेश, निष्काळजीपणे जीव धोक्यात घालणे आणि मालमत्तेचे नुकसान यासह अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते प्रतिबंधित क्षेत्रात कसे पोहोचले याचा तपास पोलीस करत आहेत. हे जोडपे उंच इमारतींवर धोकादायक स्टंट करण्यासाठी ओळखले जाते. 2024 मध्ये त्यांच्यावर 'स्कायवॉकर्स: अ लव्ह स्टोरी' नावाचा एक माहितीपट बनवण्यात आला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat