Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Govt Notice to META 'मेटा-व्हॉट्सअॅप'ला केंद्र सरकारची नोटीस नवीन युझरनेमविषयक फिचर थांबवण्याचे निर्देश

Govt Notice to META 'मेटा-व्हॉट्सअॅप'ला केंद्र सरकारची नोटीस नवीन युझरनेमविषयक फिचर थांबवण्याचे निर्देश

► वृत्तसंस्थानवी दिल्ली

भारतात व्हॉट्सअॅपच्या नवीन युझरनेम फीचरच्या वापराबाबत 'मेटा'ला नोटीस जारी केली आहे. केंद्र सरकारने मेटा-व्हॉट्सअॅपला भारतात हे फीचर सुरू करू नयेत असे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी कंपनीला तीन दिवसांत प्रतिसाद देण्यास सांगितले आहे. ऑनलाईन फसवणूक आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेशी संबंधित संभाव्य धोक्यांमुळे सरकार या फीचरचा आढावा घेत आहे. तपासादरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास मेटावर पुढील कारवाई केली जाऊ शकते.
केंद्र सरकार व्हॉट्सअॅपच्या नवीन युझरनेम फीचरच्या गोपनीयता आणि सुरक्षा पैलूंची तपासणी करणार आहे. जर पुरेशी सुरक्षा उपाययोजना लागू केली नाही, तर सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतात, असा दावा सध्या केला जात आहे. भारतातील ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, ही नवीन प्रणाली वापरकर्त्यांची सुरक्षा मजबूत करेल की फसवणूक करणाऱ्यांसाठी एक नवीन मार्ग बनेल याची शहानिशा सरकारला तपासायची आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat