Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोव्यात सणासुदीत नारळ महाग होणे दुर्दैवी; विजय सरदेसाईंचा सरकारवर हल्लाबोल

गोव्यात सणासुदीत नारळ महाग होणे दुर्दैवी; विजय सरदेसाईंचा सरकारवर हल्लाबोल

णजी : सणासुदीच्या काळात गोव्यात नारळाच्या दरात वाढ होत असल्यावरून गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'या सरकारचे हिंदुत्व केवळ नावापुरते आहे.

सणासुदीच्या काळात नारळ महाग होणे ही शरमेची बाब आहे,' अशी टीका सरदेसाई यांनी केली.

गोव्यात नारळाला धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. विविध सण आणि धार्मिक विधींमध्ये नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात नारळाच्या वाढत्या किमतींचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले.

'आमचे सरकार सत्तेत आल्यास नारळ अनुदानित केला जाईल,' असे आश्वासन त्यांनी दिले. नारळाचे उत्पादन वाढविण्यासोबतच शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही हिताचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात नारळ उत्पादनाला मोठी क्षमता असून, राज्याला देशातील 'कोकोनट कॅपिटल' बनविण्याचे उद्दिष्ट असायला हवे, असेही सरदेसाई म्हणाले. नारळ उत्पादकांना प्रोत्साहन, योग्य बाजारपेठ आणि आवश्यक सरकारी मदत मिळाल्यास गोव्याच्या कृषी क्षेत्राला याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, नारळाच्या वाढत्या दरांवरून सरदेसाई यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat