Dailyhunt
Islampur case |  इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात; सांगलीत १५ वर्षीय मुलीवर लॉजमध्ये अत्याचार

Islampur case | इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात; सांगलीत १५ वर्षीय मुलीवर लॉजमध्ये अत्याचार

ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी खळबळ

श्वरपूर - शहरातील एका १५ वर्षे ६ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला सातारा जिल्ह्यातील मायणी येथील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी पोक्सोसह अॅट्रॉसिटी अन्वये दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी यातील एकास अटक केली असून अन्य एक अद्याप हाती लागलेला नाही.

रवी लक्ष्मण दहस (१९, मूळ रा. चादापूर, ता. माळशिरस) व संतोष प्रकाश सोरमुख (रा.मायणी) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलगी व संशयित यांच्यातइन्टाग्रामवरून चॅटिंग सुरू होते. त्यातूनच त्यांची ओळख वाढत गेली. २९ रोजी संशयितांनी तिचे अपहरण केले.

संशयित संतोष याचे मायणीमध्ये हॉटेल व लॉज असून दहस हा या लॉजमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. पीडित मुलीस लॉजवर नेऊन तिच्यावर दडस याने लैंगिक अत्याचार केला.दरम्यान, सोरमुख याने या मुलीस धमकी दिली. ही मुलगी घरातूननिघून गेल्यानंतर तिच्या आजीने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली होती.

ईश्वरपूर पोलिसांनी तपास करून दहस याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोषाविरुध्द पोक्सो व अॅट्रॉ सिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. दहस यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सोरमुख हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat