Dailyhunt
Kagal accident | कागलमध्ये पेंट्सचा ट्रक पलटी; महामार्गावर वाहतूक ठप्प

Kagal accident | कागलमध्ये पेंट्सचा ट्रक पलटी; महामार्गावर वाहतूक ठप्प

पुणे-बेंगळुरू महामार्गावर ट्रक पलटी;

कागल : येथील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल अशोका समोर सेवा रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री एशियन पेंट्स घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक सातारा येथून एशियन पेंट्सची डिलिव्हरी घेऊन बेंगलोरच्या दिशेने जात होता . हा ट्रक कागल जवळ आला असता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आले होती . हा ट्रक सेवा रस्त्यावर लगत असलेल्या हॉटेल अशोका समोर आला असता रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळला .

यावेळी ट्रकमधील पेंट्सचे डबे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले. त्यामुळे महामार्गावर घसरट परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat