Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Karad News | ऐन गर्दीच्या वेळी 'गाडगीळ' शोरूममध्ये आग! कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Karad News | ऐन गर्दीच्या वेळी 'गाडगीळ' शोरूममध्ये आग! कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

कराडमधील पीएनजी शोरूममध्ये एसी डक्टला आग

राड : शहरातील शाहू चौकपरिसरातील पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ शोरूममध्ये बुधवारी दुपारी एसीच्या डक्टला आग लागल्याने शोरूममध्ये धुराचे लोट पसरले आणि ग्राहकांमध्ये घबराट उडाली.

दुपारी अडीचच्या सुमारास स्फोटासारखा आवाज होऊन बाहेरच्या एसी यंत्रणेला आग लागली. मात्र कर्मचाऱ्यांनी तत्परतेने ग्राहकांना सुरक्षित बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.कराडच्या शाहू चौकालगत आणि शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पुरूषोत्तम नारायण गाडगीळ हे सोन्या चांदीचे शोरूम आहे.

इथे ग्राहकांची कायमच गर्दी असते. शोरूममध्ये नेहमीप्रमाणे दागिन्यांची खरेदी-विक्री सुरू असताना अचानक एसीच्या डक्टमधून स्फोटासारखा आवाज येताच काही क्षणांतच धूर
कराड: पीएनजी शोरूमच्या एसी डक्टला आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणताना कराड नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान,शोरूममध्ये पसरला.

परिस्थितीची गंभीरता ओळखून कर्मचाऱ्यांनी घाईगडबड न करता ग्राहकांना बाहेर काढले. काही वेळातच परिसरात धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेची चर्चा शहरात सुरू होती. दरम्यान शोरूमच्या व्यवस्थापनाने नेमके कायझाले आहे याची माहिती घेण्यास सुरूवात करत उन्हाच्या तडाख्यामुळे हे घडले असावे का? असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

या आग आटोक्यात आणण्याच्या कारवाईत अग्निशमन अधिकारी श्रीकांत देवघरे, लीडिंग फायरमन विनोद काटरे, बाहन चालक दादासो जाधव, विठ्ठल नांदे तसेच फायरमन सतीश पवार, संदीप कांबळे, अक्षय शेलार आणि भारत जाबळे यांनी सहभाग घेत आग नियंत्रणात आणली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat