Dailyhunt
'केकेआर'समोर आज पंजाबसह सदोष रणनीतीचे आव्हान

'केकेआर'समोर आज पंजाबसह सदोष रणनीतीचे आव्हान

वृत्तसंस्था / कोलकाता :

ध्या अडचणीत सापडलेल्या आणि अधिकाधिक दिशाहीन वाटणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आज सोमवारी कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्सचा सामना करताना आपल्या खराब सुऊवातीला रोखण्यासाठी एका जोरदार पुनरागमनाची गरज असेल.

तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या या संघाला त्यांच्या सुऊवातीच्या अपयशासाठी मुस्तफिजुर रहमान, हर्षित राणा, आकाश दीप आणि मथीशा पथिराना यासारख्या प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीचे कारण देता येईल

परंतु खरी मोठी समस्या त्यांच्या सदोष संघ रणनीतीमध्ये दडलेली आहे, ज्यामुळे त्यांना सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. टी-20 क्रिकेटच्या सध्याच्या रचनेत फारसा पसंतीस पात्र नसतानाही ज्याला कर्णधार म्हणून स्थान देण्यात आले होते त्या अजिंक्य रहाणेने संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनून टीकाकारांची तोंडे काही प्रमाणात बंद केली असली, तरी संघाच्या रचनेमध्येच ही गोंधळलेली रणनीती प्रकर्षाने दिसून येते.

फिन अॅलन, टीम सेफर्ट आणि रचिन रवींद्र यांसारखे न्यूझीलंडचे तीन अव्वल दर्जाचे खेळाडू संघात असूनही केकेआरला त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यात अपयश आले आहे. या तिघांपैकी केवळ फिन अॅलनलाच संघात खेळण्याची संधी मिळाली आहे, तर गेल्या टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला टीम सेफर्ट आणि फिरकी गोलंदाजी करणारा एक सिद्ध अष्टपैलू खेळाडू असलेला रचिन रवींद्र हे दोघेही अजून बाहेर बाकावर बसूनच वेळ घालवत आहेत.

याउलट 2012 पासून संघाचा नियमित खेळाडू असलेल्या सुनील नरेनची कामगिरी खालावत असूनही केकेआरने त्याला संघात कायम ठेवल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्यावर निर्बंध घातलेल्या अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या समावेशामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. यामुळे संघात असे दोन परदेशी खेळाडू आहेत जे पूर्णपणे योगदान देऊ शकत नाहीत. त्यातच आणखी एक सिद्धहस्त टी-20 खेळाडू असलेला रोव्हमन पॉवेल संघाबाहेर असल्याने केकेआरचे संघनिवडीचे निर्णय अधिकाधिक गोंधळात टाकणारे वाटत आहेत.

संघ : कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), फिन अॅलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, रोव्हमन पॉवेल, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, सार्थक रंजन, टिम सेफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, कॅमेरून ग्रीन, सुनील नरेन, रचिन रवींद्र, वऊण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, ब्लेसिंग मुजराबानी, नवदीप सैनी, प्रशांत सोळंकी आणि उमरान मलिक.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, मिचेल ओवेन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, मार्कस स्टॉइनिस, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, मुशीर खान, प्रवीण दुबे, विशाल निषाद, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग, पायला अविनाश, शशांक सिंग.

सामन्याची वेळ: संध्याकाळी 7.30 वाजता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat