Dailyhunt
खानापूर येथील व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयात चार विभागात तांत्रिक शिक्षणाची सोय

खानापूर येथील व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयात चार विभागात तांत्रिक शिक्षणाची सोय

विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन : अद्ययावत शिक्षण देणारी संस्था म्हणून महाविद्यालयाचे नावलौकीक

खानापूर : 'तरुण भारत"चे समूह संपादक आणि लोकमान्य मल्टिस्टेटचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे, या हेतूने खानापूर येथे मागील वर्षापासून व्ही.

वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे खानापूरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाची सोय झाली आहे. विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयात जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि बदललेल्या गरजांनुसार अद्ययावत शिक्षण देणारी संस्था आहे. या महाविद्यालयात चार विभागात शिक्षण दिले जाते.

यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणक विज्ञान (CS), इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन (E&C) आणि इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (E&C) या चार प्रमुख शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व अभ्यासक्रम रोजगाराभिमुख, आधुनिक आणि उद्योगाच्या गरजांशी सुसंगत आहेत. या तांत्रिक उत्कृष्टतेवर भर देण्यात आला आहे. या महाविद्यालयात अत्याधुनिक आणि अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. एआय विभागात उच्च क्षमतेचे संगणक उपलब्ध असून विद्यार्थ्यांना मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळते. इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन विभागात सर्किट डिझाईन, एम्बेडेड सिस्टीम्स आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत. तर इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागात पॉवर सिस्टीम्स, कंट्रोल सिस्टीम्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन याचे शिक्षण दिले जाते.

व्ही. वाय. चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कृतीवर भर देवून शिकवण्यात येते. अभ्यासिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रकल्प, प्रयोग आणि सिम्युलेशनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक बाबींचे सखोल शिक्षण दिले जाते. संस्थेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे उच्चशिक्षीत व अनुभवी प्राध्यापकांकडून शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या संस्थेच्या उभारणीमागे लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांची दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

तांत्रिक शिक्षण हे रोजगारनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. आणि व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथील अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण पद्धती उद्योगाच्या गरजांशी सुसंगत असल्याने विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्र, अभियांत्रिकी उद्योग, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स आणि शासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध होतात. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या आधुनिक शाखांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक युगात विद्यार्थी तयार केले जातात. या विद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन (INNOVISION) 2025 ला मोठा प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनात दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या सर्जनशीलतेचे व नवोपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच बेळगाव येथील वसंतराव पोतदार तांत्रिक विद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवात व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि समाजाकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच या संस्थेने तांत्रिक शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विद्यार्थी - पालकांना आवाहन

खानापूरसारख्या ठिकाणी डॉ. किरण ठाकुर यांनी तालुक्यातील विद्यार्थ्याना तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अद्ययावत अशा व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाची सुरुवात केली आहे. हे धाडसाचे पाऊल आहे. तालुक्यातील पालकांनी आपल्या मुलांना या संस्थेत प्रवेश घेऊन उच्चशिक्षीत करावे. तालुक्यातील दहावी पास आणि बारावी नापास विद्यार्थी या विद्यालयात प्रवेश घेऊ शकतात. बेळगाव-खानापूर मार्गावरील लोकमान्य भवन येथे महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-प्राचार्य शिरीष केरुर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat