क्रेडाईची महसूल सचिवांकडे मागणी : ई-खाता, कावेरी-2 मध्ये तांत्रिक अडचणी
कायमस्वरुपी भाडेतत्त्वावरील मालमत्ताबाबत कावेरी-2 सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले आहेत.
त्यामुळे कावेरी-2 व ई-खातामधील तांत्रिक दोष दूर करावेत, अशी मागणी क्रेडाई बेळगावच्यावतीने राज्याच्या महसूल सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव: नुकतीच क्रेडाईच्या सदस्यांनी बेंगळूर येथे महसूल सचिवांची भेट घेतली. बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून ही भेट निश्चित करण्यात आली होती. महसूल सचिवांसमोर बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना येत असलेल्या अडचणांची माहिती देण्यात आली. बेळगावमधील अनेक मालमत्ता या निरंतरपट्टा म्हणजे कायमस्वरुपी भाडेतत्त्वावरील मालमत्ता अधिक आहेत. 100 वर्षांपूर्वी या मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात आल्या असल्या तरी या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवेळी अनेक अडचणी येत आहेत.
काही मालमत्ता भागीदारी कंपन्यांच्या
काही मालमत्ता भागीदारी कंपन्यांच्या असल्याने ई-आस्थीमध्ये नोंदणी करताना सर्व भागीदार उपस्थित असणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही भागीदार बाहेरच्या देशांमध्ये असल्याने अडचणी येत आहेत. जीपीए नोंदणीवेळी आजीवन प्रमाणपत्राचे मागणी केली जात असून हे प्रकार थांबवावे, अशी मागणी क्रेडाईकडून करण्यात आली.
यावेळी राज्याच्या महसूल विभागाचे सचिव राजेंद्र कटारिया, आयजीआर मुलीन मालिहाळ, साहाय्यक आयजीआर पाशा यांच्यासह क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, पदाधिकारी पी. एस. हिरेमठ, सल्लागार क्वॉस नुराणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तांत्रिक अडचणीमुळे खरेदी-विक्री व्यवहार मंदावले
बेळगावातील अनेक मालमत्ता कायमस्वरुपी भाडेतत्त्वावर
भागीदार बाहेरच्या देशांमध्ये असल्याने अडचणी

