Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल इंडिया 11 टक्क्यांनी मजबूत

कोल इंडिया 11 टक्क्यांनी मजबूत

वृत्तसंस्था/मुंबई

कोल इंडियाचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतील (जानेवारी-मार्च) नफा वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढून 10,839 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 9,751 कोटी होता.

कोल इंडियाने 27 एप्रिल रोजी आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल वार्षिक आधारावर 5.75 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीतील कामकाजातून मिळणारा महसूल 46,490 कोटींवर होता. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 5.25 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat