Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kolhapur News |  देशात पहिल्यांदाच! कोल्हापुरात तयार होतेय तृतीयपंथीयांची 'आपत्ती व्यवस्थापन टीम'

Kolhapur News | देशात पहिल्यांदाच! कोल्हापुरात तयार होतेय तृतीयपंथीयांची 'आपत्ती व्यवस्थापन टीम'

कोल्हापुरात देशातील पहिली तृतीयपंथीय आपत्ती व्यवस्थापन टीम

कोल्हापुर -आगामी पावसाळा आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत कौतुकास्पद आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देशातील पहिली तृतीयपंथीयांची ‘आपत्ती व्यवस्थापन टीम’ तयार करण्यात येत आहे. या विशेष टीमसाठी २७ मे पासून येथील ऐतिहासिक राजाराम तलाव येथे दोन दिवसीय ‘पूर व्यवस्थापन प्रशिक्षण’ कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

​जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण सुरू आहे. आपत्तीच्या काळात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याच्या कोल्हापूर प्रशासनाच्या या अनोख्या पॅटर्नचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे.

पहिल्या दिवशी मिळाले तांत्रिक व प्रात्यक्षिकांचे धडे
​पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी या तृतीयपंथीय बांधवांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या आणि तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महापुराच्या काळात पाण्यात मोटर बोट कशी चालवावी?​ पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला सुखरूप बाहेर कसे काढावे?​, पाण्यातून बाहेर काढलेल्या बेशुद्ध व्यक्तीला प्रथमोपचार देऊन तातडीने शुद्धीवर कसे आणावे?इन्फ्लेटेबल बोट (हवेची बोट) वेळेवर कशी फुगवून तयार करावी आणि काम झाल्यानंतर ती सुरक्षित कशी ठेवावी? अशा पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat