Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
म. ए. युवा समितीतर्फे हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

म. ए. युवा समितीतर्फे हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना, 1 जून रोजी कन्नड सक्तीविरोधात धारातीर्थ पडलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे.

तसेच कन्नडसक्तीवरून जी दडपशाही सुरू आहे, त्याविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मोर्चा काढण्याचे ठरले आहे. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बैठकीत मनोगत व्यक्त करण्याची सूचना केली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन, कन्नडसक्तीविरोधात मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी व सीमाप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी एक लाख सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी घटक समित्यांच्या बैठका घेऊन आपला निर्णय कळवावा, यासाठी युवा समिती सीमाभाग संघटनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हिंडलगा येथे सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जी मोर्चाची तारीख ठरेल त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.

याप्रसंगी सरचिटणीस मनोहर हुंदरे, पिराजी मुचंडीकर, इंद्रजित धामणेकर, नारायण मुचंडीकर, मोतेस बारदेसकर, सुधीर शिरोळे, सचिन दळवी, रमेश माळवी, सुरज जाधव, श्रीकांत नंदूरकर, निलेश काकतकर, राजू पाटील आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat