Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Monsoon राज्याला पावसाने झोडपले, आज अतिवृष्टीचा इशारा, मुंबई, पालघर, ठाणे, पुणे-सातारा घाट परिसराला अलर्ट

Maharashtra Monsoon राज्याला पावसाने झोडपले, आज अतिवृष्टीचा इशारा, मुंबई, पालघर, ठाणे, पुणे-सातारा घाट परिसराला अलर्ट

. भा. प्रतिनिधी पुणे/मुंबई : मोसमी वाऱ्यांनी शनिवारी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला झोडपून काढले. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी ते मुसळधार, तर विदर्भात पुढील चार दिवस मध्यम स्वऊपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचेही वृत्त आहे. भांडूपमध्ये रस्ता खचल्याने टेम्पो खड्ड्यात कोसळला यामुळे वाहतूक काहीकाळ बंद पडली होती.

मुसळधार पावसाने मुंबईसह नवी मुंबईतील अनेक शाळांनी सुटी जाहीर केली होती. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. राज्यातील अनेक धरणांमधील साठ्यामध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन विभागाचा आढावा घेतला आहे. येत्या सोमवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आहे. अनेक ठिकाणी घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे.

गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान हवेचा दबाव कायम आहे. याशिवाय उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, येत्या काही दिवसांत ते ओरिसा-छत्तीसगडकडे सरकण्याचा अंदाज आहे. या सर्व हवामानातील घडामोडींमुळे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांत वाढ झाली असून, राज्यात तसेच देशाच्या मध्य भागात पावसाची तीव्रता वाढली आहे.

गेल्या 24 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुरातही पावसाचा तडाखा बसला. दरम्यान, गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश, ओरिसाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागात 7 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारनंतर या भागातील पाऊस हळूहळू कमी होणार आहे.

विदर्भात काय स्थिती?”

विदर्भात रविवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर मराठवाड्याच्या काही भागात मध्यम स्वऊपाचा पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणसाठा आता 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. पुणे विभागातही पाऊस जोरदार असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणांत पाणीसाठा वाढला आहे. विभागाचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस दमदार पाऊस होणार असल्याने या साठ्यात भर पडणार आहे.

दरम्यान पालघर, मुंबई, ठाणे, पुणे-सातारा घाट परिसर या जिल्ह्यांत रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक घाट, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

शक्य असल्यास प्रवास टाळावा : मुख्यमंत्री
राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागांमध्ये येत्या सोमवारपर्यंत सातत्याने सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस आणि वादळे देखील येतील, असा इशारा हवामान विभागाने आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळता आला तर टाळावा तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानूसारच वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कनेक्टिंग लिंकवर खड्डे, तांत्रिक बाब
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत. याविषयी प्रश्न केला असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे कनेक्टर आहे तिथे दोन खड्डे आहेत. पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे आहेत, असे काही नाही. यासंदर्भात काही अभियांत्रिकी बाबी असतात. पहिला पाऊस व्हावा लागतो. तेव्हा पृष्ठभागाची डयुरेबिलीटी टेस्ट केली जाते. ते तपासून पृष्ठभागावर दुसरी लेअर टाकण्यात येत असते. या सगळ्या तांत्रिक बाबी असल्याचे सांगत फडणवीस यांनी निंदकाचे घर असावे शेजारी, असा टोला टीकाकारांना लगावला.

कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांबाबत एमएसआरडीसी निश्चित काळजी घेईल. पण आपण देशातील सर्वात उंच पूल, सर्वात रुंद बोगदा, धरणाच्या खाली बोगदा पहिल्यांदा करून दाखविला आहे. संबंधित अभियंत्यांना आपण त्यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat