Dailyhunt
माजगाव सरपंच सौ. रंजना कानसे यांना गाव विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य !

माजगाव सरपंच सौ. रंजना कानसे यांना गाव विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची ग्वाही

ओटवणे : प्रतिनिधी

माजगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. रंजना रविंद्र कानसे या माजगाव ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत महायुती पुरस्कृत उमेदवार होत्या.

त्यामुळे सरपंच सौ. रंजना कानसे यांना माजगावच्या विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. माजगाव नवनिर्वाचित सरपंच सौ.

रंजना कानसे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांच्या माजगाव निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून माजगावच्या विकासासाठी सरपंच सौ रंजना कानसे यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सौ. संजना परब, रवींद्र कानसे उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat