Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मार्केटमध्ये विकला जातोय फाटलेला मोजा

मार्केटमध्ये विकला जातोय फाटलेला मोजा

एकाच्या किमतीत खरेदी कराल 2 ग्रॅम सोने

फॅशनचे जग अनोखे आणि अजब ट्रेंड्सने भरलेले आहे. आता एक नवा ट्रेंड समोर आला असून तो प्रत्येकाला दंग करत आहे. बाजारात आता फाटलेले मोजे विकले जात असून त्याची किंमत इतकी अधिक आहे की एक जोडी खरेदी करण्यात तुम्हाला 2 ग्रॅम सोने खर्च करावे लागू शकते.

श्रीमंत लोक या फाटलेल्या मोज्यांना मोठ्या आवडीने खरेदी करत आहेत आणि त्यांना घालून स्वत:ला ट्रेंडी आणि स्टायलिश दाखवत आहेत. यापूर्वी देखील मार्केटमध्ये फाटलेले टीशर्ट, जॅकेट यासारखे कपडे मोठ्या प्रमाणात विकले गेले आहेत, परंतु मोज्यांचा हा ट्रेंड नवा आहे.

लक्झरी ब्रँड्सनी 'डिस्ट्रेस्ड लुक'ला नवे रुप दिले आहे. प्रथम फाटक्या जीन्स, जुन्या टीशर्ट आणि वॉर्न आउट जॅकेट्सची क्रेझ होती, आता तो ट्रेंड मोज्यांपर्यंत पोहोचला आहे. हे मोजे जाणूनबुजून फाडण्यात आले आहेत, ज्यात वेगवेगळे डिझाइन, कलर आणि पॅटर्न देण्यात आले आहेत. काही मोज्यांमध्ये मोठी छिद्रं तर काहींमध्ये छोटी छिद्रं आहेत, तर काहींमध्ये एम्ब्रॉयडरी आणि काहींवर स्टड्स लावण्यात आले आहेत.

एक प्रसिद्ध लक्झरी ब्रँडच्या एका फाटलेल्या मोज्याच्या जोडीची किंमत 15 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे. काही एक्सक्लुसिव्ह डिझाइन तर 80 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीत विकले जात आहे. इतक्या किंमतीत तुम्ही सहजपणे 2 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. तरीही श्रीमंत ग्राहक या मोज्यांना खरेदी करण्यासाठी रांग लावत आहेत.

का करत आहेत पसंत?

फॅशन एक्सपर्ट्सनुसार 'डिस्ट्रेस्ड' किंवा 'वॉर्न आउट' लुक खऱ्या श्रीमंतीचा प्रतीक मानण्यात येत आहे. व्यक्ती इतका श्रीमंत आहे की तो जाणूनबुजून फाटके कपडे घालू शकतो हे यातून दाखविले जाते. हा रिवॉल्ट आणि स्टेटमेंट दोन्ही आहे. युवा सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसर्स सोशलमीडियावर या फाटलेल्या मोज्यांना घालून पोस्ट करत आहेत, ज्यामुळे ट्रेंड आणखी वेगाने फैलावत आहे. परंतु हे पहिल्यांदा घडलेले नाही. 90 च्या दशकात देखील 'ग्रंज फॅशन' मध्ये फाटक्या कपड्यांची क्रेझ होती. मागील काही वर्षांमध्ये फाटक्या जीन्स, गुडघ्यांवर छिद्र असलेल्या पॅँट आणि जुन्या जॅकेट्स हाय फॅशन रॅम्पवर दिसल्या आहेत. आता मोज्यांची या यादीत नवे नाव जोडले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat