Dailyhunt
मोटारसायकलसह 12 मोबाईल हस्तगत

मोटारसायकलसह 12 मोबाईल हस्तगत

यमकनमर्डी पोलिसांची यशस्वी कारवाई

बेळगाव : मोटारसायकल चोरी प्रकरणी यमकनमर्डी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याबरोबरच हरवलेले व चोरलेले 12 मोबाईल शोधून ते संबंधितांना परत करण्यात आले आहेत.

शंकर भीमा आडिन्नावर, राहणार यमकनमर्डी आर. सी., परशराम कल्लाप्पा शिरणगी, राहणार दादबानहट्टी, परशुराम भरमाप्पा पांडरी, राहणार चिक्कलदिन्नी अशी त्यांची नावे आहेत. हंचिनाळ, ता. हुक्केरी येथील इरप्पन्ना सिदराई रेवण्णावर यांची केए 23 एक्स 812 क्रमांकाची मोटारसायकल चोरीस गेली होती.

या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक बी. के. पाटील, वाय.

डी. गुंजगी, जी. बी. नागन्नावर, पी. के. किल्लीकेतर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सीआयआर पोर्टलच्या माध्यमातून शोधण्यात आलेले 12 मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat